एटीएम कार्डच्या त्रुटीचा फायदा घेत घातला ७ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:04 PM2019-05-12T16:04:44+5:302019-05-12T16:06:25+5:30

पेट्रोलपंपावरील कामगाराने एटीएम कार्डमधील त्रुटीचा वापर करुन तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Taking advantage of the ATM card's error ; he did fraud of 7 lakh | एटीएम कार्डच्या त्रुटीचा फायदा घेत घातला ७ लाखांना गंडा

एटीएम कार्डच्या त्रुटीचा फायदा घेत घातला ७ लाखांना गंडा

Next

पुणे : पेट्रोलपंपावरील कामगाराने एटीएम कार्डमधील त्रुटीचा वापर करुन तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार हडपसर येथील टेकवडे पेट्रोल पंपावर ११ फेब्रुवारी २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला. हडपसर पोलिसांनी बँकेच्या खातेधारकावर गुन्हा दाखल केला होता.मात्र, हा प्रकार पेट्रोलपंपावरील कामगारानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी अजिंक्य टेकवडे (वय २८, रा़ आकाशवाणी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, टेकवडे यांचा आकाशवाणी समोर पेट्रोलपंप आहे़ त्यांच्याकडे स्वाईप कार्ड मशीन आहे. वाहनचालकाने पेट्रोल भरल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकाने अकाऊंट नंबरचे एटीएम कार्डचा वापर केला. पेट्रोल पंपावर असलेल्या बँकेचे स्वाईप कार्ड मशीनवर स्वाईप केल्यानंतर त्याची मशिन मधून पहिली स्लिप काढल्यानंतर मशिनवरील व्हाईट बटन दाबून तो केलेला व्यवहार रद्द करीत असे. पहिली स्लिप वाहनचालकाला देत असे.त्यामुळे वाहनचालकाला त्याची माहिती मिळत नसत नसे. हा प्रकार तब्बल एक वर्ष सुरु होता. तो लक्षात आल्यावर एक खातेदार फसवणूक करीत असल्याचे उघड झाले.

हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासात बँकेचा खातेदाराने व पेट्रोल पंपावरील एक कामगार हे मित्र आहेत़. खातेदार याचा हॉटेल व्यवसाय असून त्याच्याकडे २ एटीएम कार्ड होते. मित्राच्या मागण्यावरुन त्याने त्याच्याकडील एक कार्ड कामगाराला दिले. त्याने या कार्डाच्या सहाय्याने फसवणूक करीत आहे.

असा करता होता फसवणूक
पेट्रोल पंपावर आलेल्या एखाद्या वाहनचालकाला मला एटीएममध्ये जायला वेळ नाही़ वाहनचालकाने वाहनात पेट्रोल भरल्यानंतर त्यांना सांगायला ते पैसे मी माझ्या कार्डवरुन भरतो, तुम्ही रोख पैसे द्या़ व तो कार्डद्वारे पैसे भरल्याची पहिली पावती बाहेर आल्याबरोबर पांढरे बटण दाबून व्यवहार रद्द करायचा़ आलेली पहिली पावती तो ग्राहकाला द्यायचा़ त्यांनाही पैसे भरल्याचे वाटून ते त्याला रोख पैसे द्यायचे, अशा प्रकारे त्याने वर्षभरात तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक एस डी़ चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Taking advantage of the ATM card's error ; he did fraud of 7 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.