शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:01 IST

Sharad Pawar on Dhananjay Munde: जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

NCP Sharad Pawar: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील तीन महिन्यांपासून राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.

बीडमधील घटना आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "बीड जिल्ह्याला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. बीडमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा होता. मी स्वत: त्या भागात जेव्हा लक्ष देतो होतो, मी उभे केलेले सहा-सहा सदस्य तिथं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. जिल्ह्यात एकप्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. पण आता काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असून त्याचे परिणाम जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दिसत आहेत. जो कायदा हातात घेतो, तो कोण आहे याचा विचार न करता त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज आहे," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींची होळी, प्रतिकात्मक फाशी देत होलिका दहन

"सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही"

राज्यात मागील काही महिन्यांपासून धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या घटनांवर बोलताना शरद पवार यांनी सरकारला आवाहन केलं आहे. "राज्यातील सरसकट वातावरण असं आहे, हे काय मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती बिघडली तर त्याच्या गैरफायदा घेणारे काही घटक आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर भूमिका घ्यावी. जात आणि धर्म यातील अंतर कोणी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही," असं मत पवार यांनी मांडलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या नाराजीच्या प्रश्नावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "नाराजीच्या चर्चेवर काल जयंत पाटील यांनी बारामतीतच भाष्य केलं आहे आणि आज तुम्ही ते छापलंही आहे," असं पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण