शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

स्मृती इराणींचा राजीनामा घ्या ; राष्ट्रवादीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:52 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात अाला. तसेच स्मती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली.

पुणे : रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात केला हाेता. त्यावर अाता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रीया येत असून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अाज पुण्यात अांदाेलन करुन स्मती इराणींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली. 

    एका कार्यक्रमात बाेलताना स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील वक्तव्य केले हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रसच्या वतीने अाज पुण्यातील तांबडी जाेगेश्वरी मंदिराबाहेर अांदाेलन करुन इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात अाला. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रीयांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात अाली.

    यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे शहरअध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे स्त्रीत्वाचा आणि मात्रत्वाचा अपमान आहे. निसर्गाने स्त्रियांना दिलेल्या देणगीचा असा अपमान करणे त्यांना शोभत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्त्रिवर्गात असंतुष्टता निर्माण झाली आहे. स्मृती इराणी यांच्या वक्तव्यातून भाजपची मनुवादी मानसिकता दिसून येतेय. भाजपची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

    एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाव बेटी पढाव' चा नारा देत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच मंत्री मातृत्वाचा अपमान करणारे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपने स्मृती इरानींचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

दरम्यान या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना ही फेक न्यूज असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा