शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

महावितरणकडून मीटर रिडींग घेणे आणि वीजबिल दुरूस्तीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 19:43 IST

दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका... 

ठळक मुद्देमीटर रिडींग घेतल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांचे एकच वीजबिलशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु

पुणे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे. तसेच २३ मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यासोबतच वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरु करण्यात आले आहे. पुणे शहरात १६ लाख ४७ हजार, पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख ६७ हजार तर मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांत ६ लाख ३८ हजार वीजग्राहक आहेत. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटचे रिडींग घेतले जात आहे. एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.------------दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वत:हून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र, एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वत:हून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) दिले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस