विकास प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णत्वाला न्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 01:51 PM2019-12-21T13:51:33+5:302019-12-21T13:56:57+5:30

पदाधिकाऱ्यांच्या पालिका प्रशासनाला सूचना

Take the development project in full confidence and complete it | विकास प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णत्वाला न्या

विकास प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णत्वाला न्या

Next
ठळक मुद्देजून २०२० अखेर कर्वे रस्त्यावर मेट्रो धावणार गेल्या अडीच वर्षात यातील कुठलीही मोठी योजना पूर्ण झाली नाही़ अपेक्षेप्रमाणे नदी सुधार प्रकल्पातील टेंडर तफावत दूर करण्यासाठी तातडीने करावी़ कार्यवाही शहरातील अन्य विकास प्रकल्प मार्गी लागण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बालभारती पौड फाटा रस्ता शहरात बहुचर्चित ठरलेल्या व पर्यावरणास मारक असल्याचा आरोप

 पुणे : एचसीएमटीआर प्रकल्प घाईगडबडीत न करता सर्वांना विश्वासात घेऊन पुढे न्यावा़, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी संथ गतीने काम करणाऱ्यांऐवजी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी, नदी सुधार प्रकल्पातील टेंडर तफावत दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी़. यासह शहरातील अन्य विकास प्रकल्प मार्गी लागण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे महापालिकेत सत्तेत आल्यावर भारतीय जनता पक्षाने विविध प्रकल्पांची घोषणा केली व त्यांची अंमलबजावणी सुरू केली़. मात्र, गेल्या अडीच वर्षात यातील कुठलीही मोठी योजना अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाली नाही़.

या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरळीधर मोहोळ,उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने या पदाधिकाºयांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत विकास कामांची आढावा बैठक आयोजित केली होती़.

या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर मुरळीधर मोहोळ यांनी, आजच्या बैठकीतील चचेर्नुसार प्रशासनाने काय कार्यवाही केली. याचाही आढावा एक महिन्यानंतर घेतला जाणार असल्याचे आवर्जुन सांगितले़. तर जून,२०२० अखेर कर्वे रस्तावरील आयडीएल कॉलनी ते गरवारे कॉलेज या ५ किमी़अंतरावरील मेट्रोतून पुणेकरांना प्रवास करता येणार असल्याचे सांगून, मेट्रोचे अन्य मार्गही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली़. तसेच २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतील कामाला गती देण्यासाठी, दंडात्मक कारवाई करूनही संथ गतीने काम करणाऱ्या जैन इरिगेशनऐवजी दुसऱ्या कंपनीची नियुक्ती करावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़. यावेळी उपमहापौरांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़. 

* आढावा बैठकीतील महत्वाचे मुद्दे व प्रकल्पाची सद्य:स्थिती 

* २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना नियोजनानुसार सदर योजनेतील १७५० किमी़पैकी ३०७ किमी़पाईप लाईन टाकण्याचे काम आजमितीला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते केवळ १४३ किमी़ एवढेच झाले आहे़ तर एकूण ८६ टाक्यांपैकी ७२ टाक्यांचे काम सुरू झाले असून, यापैकी २६ टाक्या पूर्ण बांधून झाल्या आहेत. तर ज्या १४ टाक्यांचे काम सुरू झालेले नाही. तेथील जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका पदाधिकारी पुढाकार घेणार आहेत.

* नदी सुधार प्रकल्पजायका नदी सुधार प्रकल्प गेली काही वर्षे निविदेतील तफावतीमुळे रखडला आहे़. त्यामुळे हा महत्वपूर्ण प्रकल्प परत जाऊ नये यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून तातडीने निर्णय घ्यावा, असे प्रशासनास सांगितले आहे़. दरम्यान हे करीत असताना पुणेकरांचा पैसा वायफळ खर्च होणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले़.

* एचसीएमटीआर या प्रकल्पाची एकूण किंमत, भूसंपादनापोटी द्यावा लागणारा मोबदला, नागरिकांच्या सूचना व स्वयंसेवी संस्थाची भूमिका यांचा समन्वय साधून या प्रकल्पातील पुढील कार्यवाही करावी़. हा प्रकल्प शहरातील वाहतुकीवर दूरगामी परिणाम करणारा असल्याने, सर्वांना विश्वासात घेऊनच घाईगडबड न करता हा प्रकल्प पुढे न्यावा़. तसेच या प्रकल्पाची किंमत मोठी असल्याने आर्थिक जुळवाजुवळ कशी होणार याबाबतही प्रशासनाने मांडावे़.

*वैद्यकीय महाविद्यालय अहमदाबादच्या धरतीवर पुण्यातील पालिकेच्या मालकीचे व सर्वसामान्यांना परवडेल अशा वैद्यकीय महाविद्यालयात जून,२०२१ पर्यंत प्रवेश दिले जातील़. याकरिता आवश्यक सर्व परवानग्या व विश्वस्त नियुक्तीसाठी राज्य शासनाशी समन्वय साधून, याबाबत खुलासा दोन दिवसात प्रशासनाने करावा़. 

* मेट्रो जून २०२० अखेर सुरू शहरातील महत्वपूर्ण अशा मेट्रोच काम प्रगतीपथावर असून, कर्वेरस्त्यावरील ५ किमी़ मेट्रो प्रवास जून २०२० पर्यंत सुरू होणार आहे़. तसेच आरटीओ ते येरवडा हा दुसरा मार्ग डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार आहे़. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग इलिवेटर होऊ शकत नसल्याने येथे भूयारी मार्ग करण्यासाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी, चांदणी चौक ते वनाज मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी संबंधितांना ३२ लाख रुपए देण्यास मंजुरी या बैठकीत देण्यात आली़. याचबरोबर शहरातील सुमारे ८२ किमी़ मेट्रो मागार्चा डीपीआर तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली़. 

* बालभारती पौड फाटा रस्ता शहरात बहुचर्चित ठरलेल्या व पर्यावरणास मारक असल्याचा आरोप झालेल्या बालभारती ते पौड रस्ता कामाच्या निविदा पुढील दोन महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत प्रशासनाने दिली़. दरम्यान शहरातील प्रमुख ४५ रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याबाबत पथारीवाल्यांसाठी धोरणात्मक निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होईल. 

* पंतप्रधान आवास योजनेची लॉटरी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २ हजार घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार असून, शहरात या योजनेत पीपीपीच्या माध्यमातून सव्वा लाख घरांचे उद्दिष्ठ ठेवले आहे़. 

* पीएमपीएमएलपीएमपीएमएल प्रशासनाने डिसेंबर,२०२० अखेर शहरात २५०० बसेस धावतील असे नियोजन प्रशासनाने केले आहे़. यात फेम टू अंतर्गत १५० बस, ५०० ईबस, ४०० सीएनजी बस येणार असून, या बसेस करिता बस डेपो उभारण्याकरिता आवश्यक असलेल्या १७५ एकर जागैपकी ७५ एकर जागा पालिका उपलब्ध करून देणार आहे़. 

* बालगंधर्व रंगमंदिर विकास, शिवसृष्टीबाबतचेही नियोजन बालगंधर्व रंगमंदिराचा विकास करताना ते नव्याने बांधायचे की कसे याबाबत संबंधित समितीची बैठक घेण्यात येणार आहे़. तसेच शिवसृष्टी ज्या ४५ एकर जागेवर उभी केली जाणार आहे. तेथील १५० खाजगी मालमत्तांची पुन्हा मोजणी कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

Web Title: Take the development project in full confidence and complete it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.