शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डोक्याला पिस्तूल लावून घेतला हॉटेलचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 1:48 AM

एकाला अटक : शिवाजीनगरमधील धक्कादायक घटना

पुणे : भाड्याने घेतलेल्या हॉटेलच्या कराराची मुदत संपली नसतानाही जबरदस्तीने डोक्याला पिस्तूल लावून ताबा घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जागेच्या मालकासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन विठ्ठल कामठे (वय ४०, रा़ रजनीगंधा अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे़ संतोष विठ्ठल कामठे, विठ्ठल कामठे व त्यांचा वाहनचालक व इतर तिघे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ ही घटना शिवाजीनगरमधील गोकुळनगर येथील रेनबो रेस्टॉरंट येथे १७ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. 

याप्रकरणी रोनाल्ड अल्मेडा (वय ३३, रा़ येरवडा) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले, की रोनाल्ड व त्यांचे भागीदार मारियो फर्नांडिस यांनी हे हॉटेलमध्ये असताना हॉटेलच्या जागेचे मालक कामठे व इतर जण तेथे आले़ त्यांनी रोनाल्ड यांना हॉटेल बंद करायला सांगून मारियो फर्नांडिस यांना शिवीगाळ केली़ रोनाल्ड यांनी आपल्यामध्ये ६० महिन्यांचा करार झालेला असताना तुम्ही हॉटेल का बंद करायला सांगता, असे विचारल्यावर संतोष कामठे यांनी त्याच्याकडील पिस्तूल रोनाल्ड यांच्या डोक्याला लावले व गल्ल्यातील ३८ हजार ५६५ रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच संतोष कामठे याने त्याच्याकडील पिस्तूल डोक्याला लावून त्यांना व फर्नांडिस यांना हॉटेलच्या बाहेर हाकलून दिले व जिवे मारण्याची धमकी दिली़ त्यामुळे ते दोघे जिवाच्या भीतीने पळून गेले़ रोनाल्ड यांनी दिलेली डिपॉझिटची रक्कम, हॉटेलमधील साऊंड सिस्टिम, हॉटेलचे नूतनीकरण केलेले फर्निचर, एसी़ मशीन्स, टीव्ही, प्रोजेक्टर मशीन, दोन संगणक, एक लॅपटॉप, डीजे प्लेअर, किचन साहित्य व इतर साहित्य जबरदस्तीने हडप केले़ रोनाल्ड यांना त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने इतके दिवस त्यांनी घाबरून फिर्याद दिली नव्हती़ सहायक पोलीस निरीक्षक सागर गरुड अधिक तपास करीत आहेत़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी