शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पुण्यात तडीपार गुंडांची दादागिरी; चायनीज स्टॉलचालकाला धमकावून उकळली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:10 IST

या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती

पुणे : तडीपार असताना आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉलचालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा गुंडांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.शकील शब्बीर शेख (वय २३) आणि समीर शब्बीर शेख (वय २७, दोघे रा. लोहगाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत टिंगरेनगर येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात चायनीजची गाडी लावतात. फिर्यार्दी व त्यांचे २ कामगार चायनीज स्टॉलवर असताना ७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शकील शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना ‘‘आपको समीर भाईने बोला था ना, चायनीज का स्टॉल चलाने का है तो महिने का १० हजार रुपये देना पडेगा ये ले समीर भाई से बात कर’’ असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावर समीर शेख याने ‘‘तुला स्टॉल चालवायचा असेल महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन शकील शेख याला १२०० रुपये काढून दिले. तेव्हा त्याने दर महिन्याला पैसे दिले नाही तर स्टॉल चालवू देणार नाही, अशी धमकी दिली.

या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत. शकील आणि समीर शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांना येरवडा पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांनी एका महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचा नेकलेस जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्याकडून ५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी तडीपार केले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस