तडीपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:28+5:302021-02-05T05:14:28+5:30
पुणे : तळजाई वसाहत परिसरात तडीपार गुंडाने दहशत निर्माण करून नागरिकांना धमकावल्याची घटना घडली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकावून ...

तडीपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की
पुणे : तळजाई वसाहत परिसरात तडीपार गुंडाने दहशत निर्माण करून नागरिकांना धमकावल्याची घटना घडली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकावून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी गुंडाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.
सूरज उर्फ डमर्या राजू गायकवाड (वय २०, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संदीप ननावरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड याच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तो शुक्रवारी रात्री कोयत्याने नागरिकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी ननावरे आणि सहकारी तेथे गेले. त्याने पोलिसांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक केंजळे तपास करत आहेत.