शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ; काही करून कपात करायची कंपन्याची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 13:53 IST

कामावरून कमी करण्यासाठी शोधले जात आहेत विविध बहाणे 

ठळक मुद्देकंपन्यांनी कर्मचारी कपात करू नये असा केंद्र व राज्य सरकारचा कर्मचारी कपात करू नये आदेश कर्मचाऱ्यांनी दाद मागितल्यावर कामगार विभागाने बजावल्या अशा आयटी कंपन्यांना नोटीसा

शोधले जात आहेत विविध बहाणे पुणे : आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपातीची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आता कर्मचाऱ्यांना कामावरून करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून वेगवेगळे बहाणे शोधले जात आहेत. कर्मचाऱ्यांना बेंचवर बसवून, त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी त्यांना थेट कामावरून कमी करण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी दाद मागितल्यावर कामगार विभागाने अशा आयटी कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकारनेकर्मचारी कपात करू नये असे आदेश देऊन देखील काही आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना बेंचवर बसण्यास भाग पाडले जात आहे. यावर कामगार विभागाने पाठवलेल्या नोटिस मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा कहर आणि लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकू नका, वेतन कपात करू नका, कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्या, असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने सर्व खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना दिले आहेत. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) काही कंपन्यांकडून या निदेर्शांना हरताळ फासला जात असून, कर्मचारी कपात, वेतन रोखून धरणे, सक्तीच्या रजेवर पाठविणे, अर्धे वेतन देणे, असे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आयटी कर्मचारी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात आयटी कर्मचारी संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर पुणे जिल्हा कामगार उप आयुक्त कार्यालयाने संबंधित आयटी कंपन्यांना नोटीसा बजावल्या. त्यामुळे कामगारांना थेट कामावरून काढून न टाकता, त्यांना बेंचवर बसविण्याचा प्रकार आयटी कंपन्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी ''नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट'' या संघटनेमार्फत कामगार उप आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली आहे. 

........................

आतापर्यत 40 हजार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी बजावली नोटीस 

शहरात लहान मोठ्या अशा एकूण 200 हुन अधिक आयटी कंपनी असून एकट्या हिंजवडी आयटी पार्क मध्ये 80 आयटी कंपनी आहेत. राज्यातील आयटी कर्मचाऱ्यांची संख्या 32 लाख असून पुण्यात 12 लाख आयटी कर्मचारी काम करतात. लॉकडाऊन झाल्यानंतर आतापर्यत 40 हजार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी नोटीस बजावली असल्याची माहिती नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइजचे उपाध्यक्ष विवेक मेस्त्री यांनी दिली. 

 ..................................

एचआर किंवा व्यवस्थापनाकडून ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी

एखाद्या कर्मचाऱ्याने या बेकायदा प्रक्रियेला विरोध केला, तर त्याला एचआर किंवा व्यवस्थापनाकडून ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कर्मचारी कायम दहशतीच्या वातावरणात असतात. हेतुपूर्वक कर्मचाऱ्यांना बेंचवर बसविले जाते आणि दोन-तीन महिन्यांनंतर राजीनामा देण्यास भाग पाडले जाते, किंवा नवीन प्रोजेक्ट हाताळण्यास सक्षम नसल्याचे असल्याचे सांगून कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकले जाते. -हरप्रीत सलुजा, सरचिटणीस, नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट

...........

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार