शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरला 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:20 IST

हडपसर येथील म्हाडा काॅलनीजवळ 15 कुत्री मृतावस्थेत अाढळली असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही.

पुणे :  हडपसर येथील म्हाडा काॅलनीजवळ 15 भटकी कुत्री मृतावस्थेत सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली अाहे. इतकी कुत्री एकत्र मृतावस्थेत सापडल्याने त्यांना अन्नातून विष दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत अाहे. याप्रकरणी महापालिकेच्या अाराेग्य विभागाने हडपसर पाेलिसांकडे तक्रार दिली असून हडपसर पाेलीस अधिक तपास करीत अाहेत. 

    शनिवारी म्हाडा काॅलनीच्या परिसरात भटकी कुत्री मृतावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अाराेग्य विभागाला दिली. अाराेग्य विभागाकडून या घटनेची माहिती हडपसर पाेलिसांना देण्यात आली. अाराेग्य विभागातील कर्मचारी, पाेलीस उपनिरीक्षक व्ही. के. झंझाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेत सापडलेल्या कुत्र्यांचे अाैंध येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार अाहे. याबाबतचा वैद्यकीय अहवाल अाज(रविवार) मिळण्याची शक्यता अाहे. त्यानंतर पाेलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती हडपसर पाेलिसांकडून देण्यात अाली अाहे. 

    पुणे शहर अाणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या माेठ्याप्रमाणावर वाढली अाहे. रात्रीच्या वेळी ही भटकी कुत्री चाैका-चाैकांमध्ये थांबून दुचाकी चालकांच्या मागे लागत असतात. त्यामुळे अनेक अपघातही झाले अाहेत. त्याचबराेबर लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी गंभीर जखमी केल्याची अनेक प्रकरणे समाेर अाली हाेती. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या लेखिका मंगला गाेडबाेले यांनाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकरण ताजे अाहे. महापालिकेकडून या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येत असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने या कुत्र्यांची संख्या वाढत चालली अाहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाला कंटाळून त्यांना अन्नातून विष देऊन मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत अाहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरhadapsar policeहडपसर पोलीसdogकुत्राDeathमृत्यू