पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग होत असताना अशा महत्वाच्या कालावधीत दीर्घकाळ गैरहजर राहिलेल्या तिघांना पोलीस कर्मचाऱ्यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सेवेतून बडतर्फ केले.पोलीस हवालदार राहुल माणिक काळे, चालक पोलीस हवालदार रत्नदीप परशुरामशिंदे आणि पोलीस शिपाई दिनेश परेश आचार्य अशी त्यांची नावे आहेत.पुणे ग्रामीण पोलीस दलातील हे तीन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ कालावधीसाठी कर्तव्यावर गैरहजर आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गच्या महत्वाच्या बंदोबस्तासाठी त्यांना उपस्थित राहण्याबाबत कळवूनही ते हजर झाले नाही. त्यांनी शासकीय सेवेत सर्वोत्तम क्षमतेनुसार समर्पित होऊन कर्तव्यपालन करणे गरजेचे असताना आपल्या कर्तव्यापासून स्वत: ला दूर ठेवले. अशा अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तिघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे़
कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात दीर्घकाळ गैरहजर राहणारे तीन पोलीस बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:08 IST
पुणे ग्रामीण पोलीस दलातील हे तीन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय दीर्घ कालावधीसाठी कर्तव्यावर गैरहजर आहेत.
कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात दीर्घकाळ गैरहजर राहणारे तीन पोलीस बडतर्फ
ठळक मुद्देअनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली दखल