शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेज जमादार खात्यातून बडतर्फ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 21:06 IST

नीलमणी देसाईच्या पर्वती येथील जमीन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन या दोघांनी आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग केला़. ..

पुणे : जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सहभागी होऊन बेकादेशीरपणे अधिक आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आल्याने पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस नाईक परवेज जमादार यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे़. याबाबतचा आदेश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी काढला आहे़. पर्वती येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणात आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून शैलेश जगताप व परवेज जमादार यांना गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते़ त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली़. नीलमणी देसाईच्या पर्वती येथील जमीन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग केला़. देसाई यांना मदत करण्यासाठी ऋषिकेश बारटक्के याच्याकडून रोख रक्कम स्वीकारली़. तसेच लाईफ स्टाईल येथून ब्रॅडेड कपडे खरेदी केले़. बारटक्के हा गुन्हेगार आहे, हे माहिती असताना त्याच्याशी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संबंध ठेवले़. हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलीस दलाच्या शिस्तीच्या विपर्यस्त आहे, असे आरोप दोघांवर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते़.आपले भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर मोका कारवाई केली़. त्यामुळे आपल्याला या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा आरोप शैलेश जगताप यांनी केला होता़. या मोका प्रकरणात दीपक मानकर यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे.विभागीय चौकशीत दोघांनी बारटक्के याला भेटायला गेल्याचे मान्य करुन बातमीसाठी गेलो होतो, असे सांगितले़. कोणती बातमी याचा उल्लेख मात्र केला नाही़. विभागीय चौकशीत दोघांना दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता़. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी या प्रकरणाचे अवलोकन केले़. त्यांनी दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली़ त्यांनी दोषारोप मान्य नसल्याचे सांगितले़. तथापि त्यांनी त्याचे बचावार्थ कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा सदर केला नाही़. अगर नवी मुद्दा उपस्थित केला नाही़. त्यानंतर शुक्रवारी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी शैलेश जगताप आणि परवेश जमादार यांना खात्यातून बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे.शैलेश जगताप यांचे खबऱ्यांचे मोठे जाळे असून आतापर्यंत त्यांनी बेकायदा पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या १५० हून अधिक गुन्हेगारांना पकडून दिले आहे़. तसेच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक नायजेरियन तरुणांना अमली पदार्थासह पकडून दिले असून त्यांना त्याबद्दल अनेक बक्षिसे मिळाली होती़. परवेज जमादार यांनीही अनेक गुन्हे उघडकीस आणले असून त्याबद्दल त्यांना वेळोवेळी बक्षिसे देण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसsuspensionनिलंबन