शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नगर रचना’चे निलंबित हनुमंत नाझीरकर पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 21:35 IST

हनुमंत नाझीरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेले अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंंबित सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५५, रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड) याना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने महाबळेश्वर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर गेल्या एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई याठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. नाझीरकर याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी एक खास पथक तयार केले होते. या पथकाने पुणे, सातारा जिल्ह्यातील आरोपीच्या वास्तव्याची ठिकाणे सीसीटीव्ही फुटेजस तपासणी करीत होते. त्यावेळी नाझीरकर हा महाबळेश्वर परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथे शोध घेतल्यावर महाबळेश्वरमधील नाकिंदा परिसरात तो आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.फळविक्रेत्याचा फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांची पत्नी संगीता नाझीरकर, मुलगी गीतांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर अशा ६ जणांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात २१ मार्च रोजी ग्रामीण पोलिसांनी मुलगा भास्कर नाझीरकर याला अटक केली होती.दत्तवाडी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच नवी मुंबईतील ए. पी. एम. सी. पोलीस ठाण्यातही एक फसवणुकीचा गुन्हा २०२१मध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याअगोदर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची अधिक संपत्ती आढळून आल्याने नाझीरकर यांच्याविरुद्ध जून २०२० मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याची माहिती नगर विकास विभागाला कळविल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर नगर विकास विभागाने १० मार्च २०२१ रोजी हनुमंत नाझीरकर यांना निलंबित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, प्रमोद नवले, सचिन गायकवाड, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, महेंद्र कोरवी यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसfraudधोकेबाजी