नऊ महिन्यांपासून फरारी आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:54 IST2018-08-30T01:53:47+5:302018-08-30T01:54:05+5:30
दांडक्याने व बॅटने मारहाण करून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या

नऊ महिन्यांपासून फरारी आरोपी अटकेत
पुणे : दांडक्याने व बॅटने मारहाण करून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सागर दिलीप मोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली आहे.
बबिता राम राठोड (वय ३२, रा. छत्रपती स्टोन क्रशर, जांभुळवाडी रोड, ता. हवेली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड हे तपास पथकाचे स्टाफसह रात्रपाळी ड्युटीस हजर असताना मोरे हा जांभुळवाडी तलाव या ठिकाणी येणार आहे, अशी माहिती बातमीदारामार्फत पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी व शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन मोरे याला ताब्यात घेतले. परिमंडळ २ चे पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी कारवाई केली.