सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात, दिल्लीचं पथक मावळात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 10:45 PM2020-09-08T22:45:03+5:302020-09-08T22:46:28+5:30

पवना धरण परिसरातील ‘हँगआऊट’ ची ‘एनसीबी’च्या पथकाकडून पाहणी 

Sushant Singh's suicide case unravels mawal district of pune | सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात, दिल्लीचं पथक मावळात

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात, दिल्लीचं पथक मावळात

Next
ठळक मुद्देअभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, ती हत्या की, आत्महत्या याचा तपास सुरू आहे. या तपासामध्ये अंमली पदार्थ प्रकरण समोरे आले.

पिंपरी : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवतीला आज अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबईतून अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील हॅगआऊट विला या फार्म हाऊसवर तपासणीसाठी दुपारी पोहचले. रात्री उशिरापर्यंत सुशांतसिंहच्या आत्महत्येचे काही धागेदोरे येथे सापडतात का याची पाहणी पथकाडून सुरू होती. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, ती हत्या की, आत्महत्या याचा तपास सुरू आहे. या तपासामध्ये अंमली पदार्थ प्रकरण समोरे आले. त्यातून एनसीबी पथकाने रियाला मंगळवारी अटक केली. त्यानंतर  मुंबईतून हे पथक थेट सुशांतसिंह यांची ये-जा असलेल्या पवना धरण परिसरातील फार्म हाऊसवर मंगळवारी दुपारी पोहचले. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तपासणी सुरू होती. अभिनेता सुशांतसिंह अनेकदा धावपळीतून विश्रांती मिळण्यासाठी या ठिकाणी येत होता. त्यासाठी त्याने ‘हॅगआऊट’ विला हे फार्म हाऊस दोन वर्षांसाठी भाड्याने घेतल्याची माहिती समोर येत आहे. रिया व सुशांतसिंह येथे काहीवेळी आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईहून तपासणीसाठी पथक फार्म हाऊसवर दाखल झाले होते. मात्र, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहचल्यानंतर त्याठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच, अधिका-यांनी या तपासणीविषयी माहिती देण्यासही नकार दिला. मात्र, या ठिकाणाहून सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे कोणते धागेदोरे पथकाच्या हाती लागतात, याची उत्सुकता आहे.

Web Title: Sushant Singh's suicide case unravels mawal district of pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.