शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिरीष कुलकर्णी यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 9:31 PM

सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देजामीनअर्जाला विरोध करीत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा ४२ पानांचा खुलासा दाखल

पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. तसेच शिरीष कुलकर्णी यांनी आठ दिवसात पोलिसांसमोर हजर व्हावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.  याआधी पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने शिरीष यांना १८ जूनपर्यंत तपास अधिका-यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिरीष यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी देखील आरोपी आहेत. फसवणूक प्रकरणातून शिरीष कुलकर्णी यांना फेब्रुवारी महिन्यापासून अटकेतून संरक्षण मिळाले आहे. दरम्यान शुक्रवारी डीएसके समूहाचा सीईओ धनंजय पाचपोर, आर्थिक विभागाचा प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनी जामीनासाठी अर्ज केला. अर्जाला विरोध करीत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी ४२ पानांचा खुलासा दाखल केला आहे. त्यात दोनही आरोपींचा फसवणूक सहभाग असल्याची नमूद करण्यात आले आहे. या अर्जावर २० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तर २० जूनला डीएसके यांची पुतणी सई केदार वांजपे आणि जावई केदार प्रकाश वांजपे यांच्यादेखील जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालय