पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. तसेच शिरीष कुलकर्णी यांनी आठ दिवसात पोलिसांसमोर हजर व्हावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याआधी पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने शिरीष यांना १८ जूनपर्यंत तपास अधिका-यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिरीष यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी देखील आरोपी आहेत. फसवणूक प्रकरणातून शिरीष कुलकर्णी यांना फेब्रुवारी महिन्यापासून अटकेतून संरक्षण मिळाले आहे. दरम्यान शुक्रवारी डीएसके समूहाचा सीईओ धनंजय पाचपोर, आर्थिक विभागाचा प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनी जामीनासाठी अर्ज केला. अर्जाला विरोध करीत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी ४२ पानांचा खुलासा दाखल केला आहे. त्यात दोनही आरोपींचा फसवणूक सहभाग असल्याची नमूद करण्यात आले आहे. या अर्जावर २० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तर २० जूनला डीएसके यांची पुतणी सई केदार वांजपे आणि जावई केदार प्रकाश वांजपे यांच्यादेखील जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचे अॅड. चव्हाण यांनी सांगितले
शिरीष कुलकर्णी यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:31 IST
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
शिरीष कुलकर्णी यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश
ठळक मुद्देजामीनअर्जाला विरोध करीत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा ४२ पानांचा खुलासा दाखल