पुणे : विजयाची खात्री असल्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थेट विजय साजरा करण्याच्या तयारीतच आहेत. भाजपनेही मतमोजणीसाठी निश्चित केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन त्यांना मतमोजणीसाठी सुचना दिल्या. कोणत्या केंद्रावर किती मतदान झाले आहे याची सर्व आकडेवारी या कार्यकर्त्यांना पक्षाने पुरवली आहे. त्यानुसार खात्री करून घ्या व नंतरच मतमोजणी सुरू करण्यास संमती द्या असेही सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही बैठक घेतली. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना गडबड गोंधळ करू नका, काहीही अडचण, तक्रार असेल तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांना कळवा असे सांगितले. गोगावले म्हणाले, आमचे सगळे कार्यकर्ते प्रशिक्षित केलेले कार्यकर्ते आहेत. मतदानात पार पाडली तशीच जबाबदारी ते मतमोजणीतही पार पाडतील. निकालाची आम्हाला खात्री आहेच. त्यामुळेच काही नगरसेवकांनी पेढे, मिरवणूक याची तयारी केली आहे. फक्त पुण्यातच नाही तर राज्यात व देशातही भाजपाचा विजय होऊन पुर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आधीच उधाण आले आहे.
निकालाची खात्री, मात्र तरी लक्ष ठेवणार : भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 18:49 IST
फक्त पुण्यातच नाही तर राज्य व देशातही भाजपाचा विजय होऊन पुर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार आहे.
निकालाची खात्री, मात्र तरी लक्ष ठेवणार : भाजपा
ठळक मुद्देकाही नगरसेवकांनी पेढे, मिरवणूक याची केली तयारी