शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 18:49 IST

सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.

मावळ ( पिंपरी चिंचवड) -  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी स्थानिक नागरिक, पोलिस व आपदा बचाव पथकाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. “या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा,” असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले. या अपघातानंतर अनेक कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांची घालमेल वाढली असून, त्यांच्याशी सुळे यांनी थेट संवाद साधत धीर दिला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. “आज बोलण्याचा दिवस नाही, तर जखमींना मदत मिळावी, अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अधिकृत मृत आणि जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी कंबर कसली असून, दुर्घटनाग्रस्त पर्यटकांचे जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात