शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला रवींद्र बर्‍हाटेचा अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 16:12 IST

आणखी एक फसवणुकीचा गुन्हा रवींद्र बर्‍हाटेविरोधात दाखल

पुणे : बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी व जागा मागत दीड लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक फसवणुकीचा गुन्हा रवींद्र बर्‍हाटेविरोधात दाखल करण्यात आला आहे.कोथरुड पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटे, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व एका महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात रवींद्र बर्‍हाटे हा अजूनही फरार आहे. त्याचा अटकपूर्व अर्ज सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आता त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.      जमिनीबाबत समजूतीचा करारनामा करुन परस्पर दुसर्‍याला विकून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटे याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद गोकुळ ढोणे, सचिन श्रीरंग ढोणे, सुनिल पांडुरंग खेडेकर, रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे , नंदा लालदास जोरी, राकेश लालदार जोरी, राजश्री दीपक चौधरी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.       याप्रकरणी उत्तम सदाशिव केदारी (वय ७०, रा. केदारी रेसिडेन्सी, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ मे २०१४ ते २० जून २०१५ दरम्यान घडला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, उत्तम केदारी यांच्याबरोबर आरोपींनी संगनमत करुन जमिनीबाबत समुजतीचा करारनामा केला होता. त्यानंतर त्या जमिनीसाठी फिर्यादी यांच्याकडून १८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी ती जमीन परस्पर दुसऱ्या विकून फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आरोपींच्या दहशतीमुळे इतकी वर्षे त्यांनी तक्रार दिली नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक जगताप अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयArrestअटक