नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 08:33 PM2020-01-21T20:33:31+5:302020-01-21T20:33:52+5:30

न्यायाची प्रक्रिया डावलून केवळ बहुमताच्या जोरावर कायद्यांमधील सुधारणा घडवून आणणे हा लोकशाहीसाठी घातक पायंडा ठरेल.

Supreme Court challenges citizenship reform bill | नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Next
ठळक मुद्देपुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची याचिकापत्र...

पुणे : महाराष्ट्रात संविधान रक्षणासाठी कार्यरत वकील आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व संशोधन कायदा २०१९ ला आव्हान देणारे याचिकापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.
      अ‍ॅड.असीम सरोदे याचिकापत्राबाबत सांगितले की, नागरिकत्व कायद्यातील नवीन सुधारणा ही स्पष्ट व उघड स्वरूपाची मनमानी आहे. धर्माच्या आधारे भारतीय समाजाचे वर्गीकरण करणे हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारताच्या संविधानाला अमान्य आहे. आश्रित, निर्वासित व स्थलांतरित तसेच बेकायदेशीर स्थलांतरित या सगळ्या संदर्भात मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया नागरिकत्व सुधारणा विधेयकातून निर्माण होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक संस्था याला आक्षेप घेतील, मानवी हक्कांचे असे प्रश्न भारताची प्रतिमा डागाळणारे ठरेल, असे मुद्दे याचिकेत मांडले आहेत. 
न्यायाची प्रक्रिया डावलून केवळ बहुमताच्या जोरावर कायद्यांमधील सुधारणा घडवून आणणे हा लोकशाहीसाठी घातक पायंडा ठरेल. त्यामुळे हे विधेयक घटनाबाह्य जाहीर करावे अशी मागणी २२ परिच्छेदांच्या याचिकापत्रातून करण्यात आली. 
अ‍ॅड़ असीम सरोदे यांच्यासह दिलीप धर्माधिकारी, संजय जाधव, अ‍ॅड़ परिक्रमा खोत, मदन कुºहे, नकुल पटवर्धन, नुपूर गर्गे, ओंकार अडके यांनी दाखल केलेल्या याचिकापत्राची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या इतर 60 याचिकांसह होईल असा विश्वास अ‍ॅड. परिक्रमा खोत यांनी व्यक्त केला.
़़़़़़़़़
सिंबायोसिस विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा भाग म्हणून हेल्मेटसक्ती करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी हेल्मेटसक्ती करावी, अशी मागणी या याचिकेत केली होती़ या याचिकेनंतर हेल्मेटसक्ती हा विषय अजूनही गाजत आहे़ शासनाने या याचिकेवर उत्तर देताना राज्यात हेल्मेटसक्ती करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते़ त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र हेल्मेटसक्ती राबविली जाते आहे़ विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या याचिकेनंतर आता प्रथमच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थीकडून ही याचिका दाखल केली आहे़ 
 

Web Title: Supreme Court challenges citizenship reform bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.