भिडेवाडा निकालाविरोधात सर्वाच्च न्यायालयात अपील; पालिकेने आगोदरच दाखल केली कव्हेट

By राजू हिंगे | Published: October 31, 2023 08:26 PM2023-10-31T20:26:18+5:302023-10-31T20:26:58+5:30

या निकालाविरोधात भाडेकरून सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल करून अपील केले आहे....

Supreme Court appeal against Bhidewada verdict; The municipality has already filed a complaint | भिडेवाडा निकालाविरोधात सर्वाच्च न्यायालयात अपील; पालिकेने आगोदरच दाखल केली कव्हेट

भिडेवाडा निकालाविरोधात सर्वाच्च न्यायालयात अपील; पालिकेने आगोदरच दाखल केली कव्हेट

पुणे : भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाडयाचा ताबा पुणे महापालिकेला देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाविरोधात भाडेकरून सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल करून अपील केले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री बाई  फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. पुणे शहरातील बुधवार पेठ येथे तात्याराव भिडे वाड्यामध्ये ही शाळा सुरु करण्यात आलेली आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम २००६ पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या २४ भाडेकरूंनी याप्रकरणी पालिकेच्या विरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात ८० वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता.

या निकालाविरोधात भाडेकरूंनी सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण या वाड्याबाबत पालिकेनेही सर्वाच्च न्यायालयात कव्हेट दाखल केलेली आहे.

Web Title: Supreme Court appeal against Bhidewada verdict; The municipality has already filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.