शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

सात-बारा हाताने लिहून द्यावा : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 9:00 PM

तांत्रिक अडचणीवर पुढील पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास तलाठ्यांनी हाताने सात-बारा लिहून द्यावेत..

ठळक मुद्देतिढा सात-बाऱ्याचा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

पुणे : सर्व्हर बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळण्यास अडथळे येत असून त्यामुळे कर्ज वाटप प्रक्रियेला अडचणी येत आहे. संगणकीय प्रणाली व्यवस्थित काम करत नाही तोपर्यंत तलाठ्याने हाताने लिहिलेला सात-बारा सुरु करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासमवेत सुळे यांनी बैठक घेतली. बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील नागरी समस्या, सिंहगडावरील स्टॉलधारकांच्या समस्या तसेच पुण्यातील रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या हरकतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, सुनील चांदेरे, रणजीत शिवतरे, सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे या वेळी उपस्थित होते. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सात-बारा उतारा मिळत नाहीत, अशी कारणे त्या त्या गावच्या तलाठ्यांकडून देण्यात येत आहेत. तांत्रिक अडचणीवर पुढील पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास तलाठ्यांनी हाताने सात-बारा लिहून द्यावेत. त्यामुळे कर्जप्रकरणे अडकून राहणार नाहीत, अशी सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष थोरात यांनी मांडली. त्यावर सकारात्मक विचार करावा, असे सुळे यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील सबस्टेशन, पुरंदर तालुक्यातील जेऊर फाटा रेल्वे उड्डाणपूल, शिरूर तालुक्यात रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन हब इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून झालेली पिकांची हानी, सिंहगडावरील स्टॉलधारकांचे पुनर्वसन, मांगडेवाडी, फुरसुंगी, शिवणे, न्यू अहिरे या भागातून जाणाऱ्या रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या असलेल्या हरकती, अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेbankबँकonlineऑनलाइनFarmerशेतकरी