शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पिंपरीतील 'मेकॅनिक वूमन'ची बातच न्यारी; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळतात 'लालपरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 1:21 PM

महिला शिक्षणाचा प्रसार झाला आणि सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. एसटी महामडळामध्येही अशीच क्रांती झाली आहे.

पिंपरी : बसचे स्पिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे यांसारखी अवजड कामे पुरूष मेकॅनिकच करू शकतात, असे चित्र काही वर्षापूर्वी होते. परंतु बदलत्या काळानुसार यात बदल झाला आहे. एसटी महामंडळात पुरूष मेकॅनिकच्या खांद्याला खांदा लावून महिला मेकॅनिकही रोज ही अवजड कामे करीत आहेत. पिंपरीतील वल्लभनगर आगारात सध्या चार महिला मेकॅनिक बस दुरूस्तीचे काम करतात.

महिला दिनानिमित्त या महिला मेकॅनिकशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या की, सुरूवातीला माहिती नव्हतं की एसटी महामंडळात नेमक काय काम कराव लागत. जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. तेव्हा रोज स्पिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे, ऑईल बदलणे, ग्रिसीगं करणे, ही अवघड कामे महिलांनी कशी करायची असा प्रश्न पडला होता. परंतु आता या कामाची सवय झाली आहे. शिल्पा वानखडे, राधा विभूते, रेखा जाधव, वंदना गायकवाड या चार महिला मेकॅनिक सध्या वल्लभनगर आगारात काम करीत आहेत.

महिला शिक्षणाचा प्रसार झाला आणि सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. एसटी महामडळामध्येही अशीच क्रांती झाली आहे. एसटीमध्ये क्लार्क, अधिकारी अगदी कंडक्टरपदीही महिला कार्यरत आहेत. काही वर्षापूर्वी एसटी चालक आणि एसटीच्या मेकॅनिक विभागात मात्र पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र मागील काही वर्षांपासून एसटीने महिला मेकॅनिकची एसटी महामंडळात भरती केली आहे. त्यामुळे महिला या क्षेत्रात कमी करण्याची संधी मिळाली.--

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावापुरूष मेकॅनिकच्या बरोबरीने महिलांनाही अवजड कामे करावी लागतात. एसटी महामंडळाच्या गॅरजे मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला. नवीन अत्याधुनिक मशीन आल्या तर अवघड असणारी कामे सोपी होतील. अनेक महिला या अवघड कामांमुळे या क्षेत्रात येत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर महिला मेकॅनिकांना त्यांची मदत होईल व महिला या क्षेत्रात येतील, अशा भावना महिला मेकॅनिकांनी व्यक्त केल्या आहेत.

--

चार वर्षापासून एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करीत आहे. सुरूवातीला हे जमल की नाही, असे वाटले होते. परंतु आता सवय झाली आहे. क्लचप्लेट बदलणे, गिअर बॉक्सची कामे, टायर उचलणे, बसचा मेन्टन्स. ही सर्व कामे महिला मेकॅनिक करतात. सध्या करत असलेल्या काम बद्दल समाधानी आहे.

रेखा जाधव, महिला मेकॅनिक, वल्लभनगर आगार

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाST Strikeएसटी संपWomen's Day Specialजागतिक महिला दिन