भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:37+5:302021-08-23T04:14:37+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भोर, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, राजगड ज्ञानपीठ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने अनंतराव धोपटे ...

Superstition Eradication Thought Convention at dawn | भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन

भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भोर, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, राजगड ज्ञानपीठ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने अनंतराव धोपटे महाविद्यालयामध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन ऑनलाइन आणि कोविडच्या नियमांचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झाले पार पडले

संमेलनाचे उद्घाटन डाॅ. शैला दाभोलकर यांनी आॅनलाईन पद्धतीने सातारा येथून केले. स्वागत भाग्यश्री पाटील यांनी केले. तर प्रस्ताविक डाॅ. अरुण बुरांडे यांनी केले. संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका डॉ. रोहिदास जाधव यांनी मांडली. यावेळी धनंजय कोठावळे, डॉ. सुरेश गोरेगावकर, गोविंद भिलारे ,सुरेश शाह, डॉ. ए. सी. बिराजदार, सुरेश सुतार, रवींद्र भालेराव, सविता कोठावळे, अशोक शिंदे, अधिक सुतार, विवेक पोळ, विजय कारभळ, विशाल सावंत, नीलेश घोडेस्वार, सुनंदा गायकवाड उपस्थित होते.

सूत्रसंचलन सविता कोठावळे व सुजाता भालेराव यांनी केले तर ज्ञानोबा घोणे आभार मानले.

Web Title: Superstition Eradication Thought Convention at dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.