अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेवर सुनील महाजन यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:48 AM2018-01-29T11:48:47+5:302018-01-29T11:59:19+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

Sunil Mahajan's unanimous selection on the All India Marathi Natya Parishad | अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेवर सुनील महाजन यांची बिनविरोध निवड

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेवर सुनील महाजन यांची बिनविरोध निवड

Next
ठळक मुद्देपुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची थेट वर्णी रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे : सुनील महाजन

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी राज्यभर निवडणूक होत असताना पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कलासंस्कृती परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 
या वेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, वैैभव जोशी, अभिनेते माधव अभ्यंकर, महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते. पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. त्यामध्ये सुनील महाजन, योगेश सोमण, दीपक रेगे, भाऊसाहेब भोईर, राज काझी, दीपक काळे आणि सुरेश धोत्रे यांचा समावेश आहे. पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच सुनील महाजन आणि योगेश सोमण यांनी केले होते. पुणे शाखा त्याला प्रतिसाद देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी अर्ज मागे घेऊन बिनविरोधला सकारात्मक प्रतिसाद दिला. नाट्य परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंग न देता, एकमेकांवर चिखलफेक न करता रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी इच्छा महाजन यांनी व्यक्त केली होती. यानिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन नाट्यव्यवसायाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

Web Title: Sunil Mahajan's unanimous selection on the All India Marathi Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे