Pune: सुनेत्रा पवारांचे बारामतीत क्रेनद्वारे १२५ किलो फुलांचा हार घालून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:37 IST2024-02-29T11:33:33+5:302024-02-29T11:37:17+5:30
मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सुनेत्रा पवार यांचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी क्रेनद्वारे १२५ किलोंचा हार घालून केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आले आहे...

Pune: सुनेत्रा पवारांचे बारामतीत क्रेनद्वारे १२५ किलो फुलांचा हार घालून स्वागत
बारामती (पुणे) :बारामतीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांची सर्व ताकत पणाला लावल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच त्यांच्या गटाच्या लोकसभेच्या उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जाते. याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांचे मतदारसंघात दाैरे सुरू झाले आहेत. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सुनेत्रा पवार यांचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी क्रेनद्वारे १२५ किलोंचा हार घालून केलेले स्वागत चांगलेच चर्चेत आले आहे.
यावेळी ‘वहिनीसाहेब’ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकच वादा ‘अजितदादा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. या घोषणांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे महत्त्वपूर्ण संकेत दिले. माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, प्रियांका मांढरे यांच्या वतीने ‘नारी शक्तीचा सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पोलिस, स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रममधील विजेत्या महिलांचा सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किरण गुजर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, सपकळवाडीचे सरपंच तानाजी सोनवणे व अजित सोनवणे, सागर भिसे, पप्पू खरात, केदार पाटोळे, विजय तेलंगे, किरण बोराडे, तुषार शिंदे, अंकुश मांढरे, नीलेश जाधव, सुनील शिंदे, शिर्डीचे पै. मदन मोका, जालिंदर सोनवणे व आदी उपस्थित होते.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतचे रूप बदलले आहे. राज्यात आदर्श अशी सार्वजनिक सदनिका उभी राहिली आहे. आयोजक बिरजू मांढरे यांनी ‘अजितदादांच्या विचारांचा खासदार विजयी करणार असल्याचे सांगत महिलांच्या उत्कृष्ट कार्यास शाबासकी मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मांढरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. यावेळी किरण गुजर यांनी मनोगत व्यक्त केले.