महापालिकेत सुनेत्रा पवार यांची अचानक एन्ट्री..! निधीच्या ‘पक्ष’पाती वाटपावर आयुक्तांची बैठक
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 6, 2025 19:32 IST2025-03-06T19:31:05+5:302025-03-06T19:32:29+5:30
पक्ष बघून निधी दिला जातो, असा आरोप देखील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेत सुनेत्रा पवार यांची अचानक एन्ट्री..! निधीच्या ‘पक्ष’पाती वाटपावर आयुक्तांची बैठक
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी अचानक भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच महापालिकेत आल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर याआधी भाजपची सत्ता असल्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान दिला जातो. राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव केला जातो. असे गाऱ्हाणे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडले होते. याबाबत खासदार सुनेत्रा पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार या थेट महापालिकेत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्ष बघून निधी दिला जातो, असा आरोप देखील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.