शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 06:34 IST

सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची स्थावर व जंगल मालमत्ता ७१ कोटी रुपयांची असून, त्यांच्यावर १२ कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी २ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज इतरांना दिले. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार व नणंद सुप्रिया सुळे यांना ३५ लाखांचे तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाखांचे कर्ज दिले. पती अजित पवार यांनाही ६३ लाखांचे व सासू आशाताई पवार यांना ८२ लाखाचे कर्ज दिले दिल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

सुनेत्रा पवार यांची मालमत्ताजंगम मालमत्ता    १२.५६ कोटी रुपये स्थावर मालमत्ता    ५८.३९ कोटी रुपये बँकांमध्ये गुंतवणूक    २.९७ कोटी रुपये शेअर्स व इतर गुंतवणूक    १५.१९ लाख रुपये एलआयसीमध्ये गुंतवणूक    ५७.७६ लाख रुपये सोने, चांदी व हिऱ्याचे दागिने    ३४.३९ लाख रुपये रोकड    ३.९६ लाख रुपये जमीन    ५८ एकर ६८ गुंठे पुण्यातील कल्याणीनगर, पाषाण, बिबवेवाडी तसेच मुंबईमध्ये फ्लॅट 

अजित पवारांकडे ५० कोटींची मालमत्ता- सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे. त्यानुसार अजित पवार यांच्याकडे ५० कोटी ४० लाख ७६ हजार ६२ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.- ३ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम असून, बँक खात्यातील ठेवी २ कोटी २७ लाख रुपयांच्या आहेत. बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स यामधील गुंतवणूक ३४ लाख ८८ हजार ८५८ रुपयांची आहे.

धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख रुपयेमविआचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ८ कोटी १६ लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकूण ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्ज आहे.  

अमोल कोल्हेंकडे आठ कोटी १२ लाखांची संपत्तीडॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे ८ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एकूण ३ कोटी ९९ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केली आहे. कोल्हे यांच्याकडे ‘पेजेरो’ ही चारचाकी गाडी असून, तिची किंमत ७ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे. तसेच बुलेट दुचाकी आहे.

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४