‘विश्वास’ शब्दावरच राहिला नाही ‘विश्वास’; लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 09:27 IST2024-08-31T09:26:51+5:302024-08-31T09:27:02+5:30
लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरच ‘विश्वास’ राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली.

‘विश्वास’ शब्दावरच राहिला नाही ‘विश्वास’; लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत
लोकमत न्यूज नेटवर्क, काटेवाडी (पुणे) : ग्रामविकासाचा पॅटर्न म्हणून काटेवाडीचे नाव राज्यात नाही तर देशात अग्रगण्य आहे. गावाबद्दल आत्मसन्मान असल्याने प्रपंचाकडे दुर्लक्ष करून २०-२२ वर्षे गावाच्या विकासासाठी मनापासून झोकून देऊन काम केले. आत्तापर्यंत २०० कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरच ‘विश्वास’ राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली.
राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल काटेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खदखद व्यक्त केली.