शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 10:55 IST

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी बजावलेले समन्स ...

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी बजावलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाउस न्यायालयात गेल्याने पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले. अखेर हे समन्स त्यांच्या घरी पोचले आहेत.दरम्यान, या दाव्याची सुनावणी आजी-माजी खासदार- आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होत आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हाजीर होण्याचे समन्स बजावले आहेत. या प्रकरणी आज (दि. १८) सुनावणी होणार आहे. समन्स मिळाल्याने आता सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते. हे समन्स दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात गेले आहेत. मात्र, राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात केली जाणार होती. नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांची घरी पोचले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे.  ... तर अटक वॉरंटदाव्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत राहुल गांधी यांना बजावलेले समन्स त्यांच्या घरी पोचले आहे. त्याबाबतचा टपाल विभागाचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. समन्स मिळाल्यानंतरही गांधी गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघू शकतो.- अॅड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील    

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयcongressकाँग्रेसBJPभाजपा