इनरव्हील क्लब नारायणगावच्या अध्यक्षपदी सुजाता भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:59+5:302021-07-31T04:09:59+5:30
इनरव्हील क्लब या सामाजिक संस्थेचा पदग्रहण समारंभ कलासागर कार्यालयात पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वल्लभ ...

इनरव्हील क्लब नारायणगावच्या अध्यक्षपदी सुजाता भुजबळ
इनरव्हील क्लब या सामाजिक संस्थेचा पदग्रहण समारंभ कलासागर कार्यालयात पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वल्लभ बेनके होत्या. या वेळी जि. प. सदस्या आशा बुचके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच पुष्पा आहेर, रमेश भुजबळ, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, गणेश देशमुख, संपत शिंदे, मंगेश मेहेर, मिलिंद झगडे, वनअधिकारी मनीषा काळे, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल कांकरिया, ज्योती संते, अॅड. सुनीता चासकर, रोटरी क्लब ,लायन्स क्लब, आदिशक्ती महिला प्रतिष्ठान, भटकंती ट्रेकर्सचे पदाधिकारी उपस्थित होते .
या नूतन कार्यकारिणीत खजिनदार प्रीती शहा, आयएसओ सोनल खैरे, एडिटर समृद्धी वाजगे, करस्पोंडन्स रश्मी थोरवे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, सरपंच योगेश पाटे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोटरी क्लब अध्यक्ष सचिन घोडेकर, लायन्स क्लब अध्यक्ष मिलिंद झगडे, अर्थसंपदाचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे, डॉ. लहु खैरे, भटकंती ट्रेकर्सचे सुदीप कसाबे आदींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रश्मी थोरवे यांनी मानले.
सुजाता भुजबळ
फोटो - अंजली खैरे