शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 22:36 IST

वाघोलीत अवैध दारूविक्रेता तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली बाजारतळ शेजारी झोपडपट्टीजवळ सोमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली.

वाघोली : वाघोलीत अवैध दारूविक्रेता तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली बाजारतळ शेजारी झोपडपट्टीजवळ सोमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तरुणाने चिठ्ठीमध्ये पैशासाठी पार्टनर त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. 

गणेश शेळके (वय २१, रा. बाजारतळ गायरान झोपडपट्टी) असे आत्महत्या केलेल्या दारूविक्रेत्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेश शेळके बाजारतळ गायरान झोपडपट्टीमध्ये काही पार्टनरच्या मदतीने अवैध दारूविक्री करीत होता. शेळके याने घर व अवैध दारूविक्रीच्या ठिकाणाजवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी हलविण्यात आला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी शेळके याने पार्टनरमुळे आत्महत्या करीत असल्याचे एका चिठ्ठीत लिहिले आहे. दारूधंद्याला पार्टनर होता, त्याचबरोबर धंदा चालू करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली व गाडी जप्त करून पैशाची मागणी करीत असल्याने फाशी घेत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणेPoliceपोलिस