शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित भामा आसखेड धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:56 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासिनतेचा बळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने आले नैराश्य

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

        ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ - सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेड जलाशयात रौंधळवाडी गावच्या हद्दीत बबन सखाराम रौधळ यांच्या घरासमोरील जागेत आत्महत्या केली.. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्या समोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.  गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागीतली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुर्नवसन करा असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेडचे प्रशासनाने त्यातील पात्र अपात्रच्या फेऱ्यात खातेदारांना घेतले आहे. वारंवार हेलपाटे मारुनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळ याने जलसमाधी घेतली.

         गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजुर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंब संख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र  कुटुंबातील सदस्य संख्या २१ होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते. परंतू, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. त्याकडे १९८९ सालची कागदपत्रे वारंवार मागितली जात होती. त्यातच उदरनिवार्हाचे साधन दुसरे नसल्याने कर्ज झालेले होते. सेक्शन १८ / २ ८ मध्ये जमिनीचा मोबदल्यासाठी दावा होता. त्याचेही वाढीव पेमेंट मिळणे बाकी होते. यामुळे आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शोधण्यासाठी प्रथम स्थानिकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या १४ जवानांच्या दोन पथकांनी  शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता

टॅग्स :PuneपुणेDamधरणSuicideआत्महत्या