शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 19:40 IST

गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत महिलेला पती आणि जावई सर्व प्रॉपर्टी,राहते घर,बँकेतील पैसे, दागदागिने नावावर करण्यासाठी त्रास देत होते.

पुणे : मृत्युनंतर सर्व प्रॉपर्टी, राहते घर, दागदागिने, आरडीएसचे पैसेनावावर करण्याकरिता तगादा लावणाऱ्या पती व जावयाच्या त्रासामुळे एका ज्येष्ठ महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना धनकवडी येथील वनराई कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी पतीसह जावयाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुपमा अशोक लेले (वय ६७, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अशोक दिगंबर लेले (रा. वनराई कॉलनी, धनकवडी) तसेच जावई नितीन नंदकुमार डहाळे (रा. जिनस टॉवर्स, रास्ता पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपमा लेले यांचे बंधू बाळकृष्ण आगाशे (वय ७०, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत अनुपमा यांना मेहुणे अशोक आणि त्यांचा जावई नितीन डहाळे त्रास देत होता. राहते घर, दागदागिन्यांची विक्री करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. डहाळे याने ठेवीचे पैसे त्याच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. अनुपमा यांची राहते घर विकण्याची अजिबात इच्छा नव्हती. डहाळे दडपण आणण्यासाठी त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. पती आणि जावयाने दिलेल्या त्रासामुळे बहीण अनुपमा यांनी ३० मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला असल्याचे अनुपमा यांचे बंधू बाळकृष्ण आगाशे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. केंजळे तपासकरत आहेत.

---

टॅग्स :DhankawadiधनकवडीWomenमहिलाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस