कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:28 PM2019-08-21T19:28:05+5:302019-08-21T19:29:40+5:30

पुणे- नगर रस्त्यावर वरील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवर असलेल्या पुलावरून एका इसमाने उडी मारून आत्महत्या केली..

Suicide by jumping from a bridge in Koregaon Bhima | कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारून केली आत्महत्या

कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारून केली आत्महत्या

Next

शिरूर : पुणे- नगर रस्त्यावर वरील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवर असलेल्या पुलावरून एका इसमाने उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी ( दि. २१) सकाळच्या सुमारास घडली आहे. भीमा नदीवरील पुलावरील रस्त्याने आज सकाळच्या सुमारास संदीप बबनराव कवडे (वय ४६ रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे ) हे त्यांच्या ताब्यातील (एमएच .१६ एस. १५७७ ) ही दुचाकी घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी अचानक रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून नदीवरील पुलावरून उडी मारली. 

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, राजेंद्र पवार, निरज पिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत सदर इसमाच्या खिशातील डायरी व मोबाईलच्या आधारे नातेवाइकांशी संपर्क करत माहिती दिली. कवडे यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी मृत संदीप कवडे यांचा मृतदेह ओळखला. याबाबत कोरेगाव भीमाच्या पोलीस पाटील मालन रामदास गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि .पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

Web Title: Suicide by jumping from a bridge in Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.