दिराकडून शरीरसुखाच्या मागणीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 03:34 IST2018-09-29T03:34:31+5:302018-09-29T03:34:49+5:30

लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 Suicide by demanding body's health | दिराकडून शरीरसुखाच्या मागणीने आत्महत्या

दिराकडून शरीरसुखाच्या मागणीने आत्महत्या

पुणे - लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने २७ सप्टेंबर रोजी आंबेगावमध्ये आत्महत्या केली. दिराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
आंबेगाव-बुद्रुकमधील एका सोसायटीत राहणाºया २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २९ वर्षीय दिरास अटक केली आहे. आरोपी छोटी-मोठी फॅब्रिक्रेशनची कामे करतो.
आरोपीचा भाऊ व आत्महत्या केलेल्या महिलेचा ६ डिसेंबर २०१३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोनच महिन्यांत दीर तिला मानसिक त्रास देऊ लागला. विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या महिलेचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला सांगण्याची भीती दाखवत दीर तिला ब्लॅकमेल करीत होता. बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने शरीरसुखाची मागणीही केली होती. तिने यास नकार दिल्याने तो तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत होता.

Web Title:  Suicide by demanding body's health