शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 11:18 IST

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या...

येरवडा (पुणे): येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गणेश जगन्नाथ तांबे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या बंदयाचे नाव असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा खुल्या कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या गणेश जगन्नाथ तांबे या कैद्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने येरवडा पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान गणेश तांबे हा विरार पोलिस स्टेशन येथील 2010 मध्ये केलेल्या खुनाच्या  गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी होता.

वसई जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला खुनाच्या गुन्ह्यासाठी  जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मे 2019 पासून ठाणे मध्यवर्ती कारागृह इथून येरवडा खुल्या कारागृहात त्याला दाखल करण्यात आले होते. खुल्या कारागृहातील स्वयंपाकगृह येथील काम त्याला  देण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाचे काम उरकल्यानंतर बराक  क्रमांक 2 येथे त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे इतर कैद्यांनी पाहिले.

खुल्या  कारागृहाचे प्रभारी अधीक्षक जी.ए. मानकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती कारागृह विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली. वैद्यकीय तपासणी पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. या आत्महत्येप्रकरणी येरवडा पोलिसांना माहिती देण्यात आली असून येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

घटनास्थळी येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे यांनी भेट दिली. आत्महत्या केलेल्या बंदयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाjailतुरुंग