शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसक्षेत्राची पडताळणी होणार ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 12:07 IST

उत्तर प्रदेशापाठोपाठ  महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते.

ठळक मुद्देपथदर्शी प्रकल्पाची होणार सुरुवात : ऊसक्षेत्र, सभासदसंख्येत अचूकता येण्यासाठी निर्णय कारखान्यांकडून सांगितले जाणारे क्षेत्रही अचूक येण्यास मदत होणारऊस उत्पादन अधिक अचूक अंदाज वर्तविता येणार

पुणे : ऊसक्षेत्र, सभासदसंख्या व कारखान्यांत होणाऱ्या गाळपाचा अचूक अंदाज यावा, यासाठी ऊसक्षेत्राची ऑनलाईन पडताळणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साखर आयुक्तालयाने हाती घेतला आहे. एकच सभासद दोन वेगवेगळ्या कारखान्यांत असल्यास त्याची माहिती समजणार असून दुबार नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती हाती येणार आहे. त्यामुळे कारखान्यांकडून सांगितले जाणारे क्षेत्रही अचूक येण्यास मदत होईल. परिणामी, गाळप हंगामाबाबत अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार असून, त्याप्रमाणे सरकारला धोरण ठरविणेदेखील सोपे जाईल. उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार हेक्टर आहे. उत्तर प्रदेशापाठोपाठ  महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते. गेल्या दोन हंगांमात महाराष्ट्राने १०७ लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने साखर उत्पादन ९० ते ९५ लाख टनांदरम्यान राहील, असा अंदाज सुरुवातीला वर्तविला होता. हा अंदाज फोल ठरवत साखर उत्पादनाने विक्रमी १०७ लाखांचा टप्पा गाठला. दुष्काळाच्या काळात तर दुसऱ्या कारखाना क्षेत्रातील ऊस दाखविण्याकडे काही कारखान्यांचा कल असतो. त्यामुळेदेखील नियोजनात चूक होऊ शकते.याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘कारखाना क्षेत्रातील उसाचा अचूक अंदाज यावा, यासाठी आगामी गाळप हंगामापासून ऊसक्षेत्राची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे एक शेतकी सभासद किती कारखान्यांना ऊस देतो, त्याचे क्षत्र किती, याची माहिती मिळेल. अनेकदा काही ठिकाणी ऊसक्षेत्र फुगविले जाते. त्यामुळे उत्पादनाचा अंदाज बांधणे अवघड होते. अहमदनगर जिल्ह्यात सुरुवातीला ९८ लाख हेक्टर क्षेत्र दिले होते. नंतर केलेल्या तपासणीत ते ५० लाख हेक्टर भरले. एकाच शेतकºयाचे क्षेत्र अनेक कारखान्यांनी दाखविल्याने असे झाले. एखादा शेतकरी अनेक कारखान्यांना ऊस जरी देत असला, तरी त्याच्या क्षेत्रापैकी तो किती क्षेत्रावरील ऊस कोणकोणत्या कारखान्यांना देतो, याची नोंद हवी. पुढील टप्प्यात महसूल विभागाकडे सात-बारा उताºयावर नोंद झालेला ऊसच ग्राह्य धरण्यात येईल. महसूल विभागाची माहिती साखर आयुक्तालयाच्या संकेतस्थळाला जोडण्यात येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.....ऊस उत्पादन अधिक अचूक अंदाज वर्तविता येणारगावनिहाय ऊसक्षेत्राची माहिती ठेवण्यात येणार आहे. आगामी हंगामापासून  या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात होईल. येत्या आठ दिवसांत हा प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचे क्षेत्र व किती कारखान्यांना त्यांचा ऊस जातो, याची माहिती समजेल. त्यामुळे ऊस उत्पादनाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त..............

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेonlineऑनलाइन