शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

साखर कारखान्यांना द्यावे लागणार १३०० कोटींचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:21 AM

ऊस गाळप केल्यानंतर मुदतीत पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजदराने उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्याचा आदेश साखर आयुक्तालयाने दिला आहे.

पुणे : ऊस गाळप केल्यानंतर मुदतीत पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजदराने उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्याचा आदेश साखर आयुक्तालयाने दिला आहे. गेल्या हंगामात एकही कारखाना मुदतीत एफआरपी देऊ शकला नव्हता. त्यामुळे जवळपास १३०० कोटी रुपयांचे व्याज या कारखान्यांना द्यावे लागेल.शुगरकेन कंट्रोल आॅर्डर नुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यावर कारखान्यांना १५ टक्के व्याज द्यावे लागेल. ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही जनहित याचिका स्वीकारुन साखर आयुक्तांना त्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत साखर आयुक्तालयाने वेळेत एफआरपी न देणाºया कारखान्यांनी १५ टक्के व्याजाने एफआरपी द्यावी, असे आदेश दिले आहेत.राज्यातील २०१८-१९च्या ऊस गाळप हंगामामधे एकाही कारखान्याला एफआरपीची रक्कम वेळेत देता आली नाही. शेतकरी संघटनांनी त्यासाठी तीव्र आंदोलन केले होते. राज्यात एफआरपीची सुमारे २३ हजार २९३ कोटी रुपयांची रक्कम कारखान्यांनी ऊस उत्पादकांना देणे लागत होते. त्या पैकी १३ हजार कोटी रुपये विलंबाने दिले गेले. अजूनही ३९७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. त्याचबरोबर गेल्या गाळप हंगामापूर्वीची देखील २४३.८३ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. गेल्या हंगामात साखर आयुक्तालयाने ८२ कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावण्याची कारवाई केली होती.साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, गेल्या हंगामामधे एकही कारखान्याला वेळेत एफआरपी देता आली नाही. त्यामुळे १९५ कारखान्यांना व्याज द्यावे लागेल. संपूर्ण राज्याला हा निर्णय तत्काळ लागू होणार नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने