शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

लठ्ठपणा सतावतोय? बॅरिऍट्रिक सर्जरी ठरतेय एक वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:37 IST

धावपळ, चुकीची जीवनशैली, फास्टफूड, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते आहे...

- डॉ. शशांक शहा

लठ्ठपणा ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे.  वजन वाढवणे एकवेळ जमू शकते, पण वाढलेले वजन कमी करणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे. सध्याची धावपळ आणि चुकीची जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असले, तरी फास्टफूडचे सेवन, प्रक्रिया करून पिकवलेले अन्न, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते. आपले वजन वाढल्याने आपण बेढब दिसू लागलो म्हणून किंवा काहीतरी इंटरनेटवर पाहून तात्पुरते उपाय केले जातात पण ते म्हणावे तितके प्रभावी ठरतातच असे नाही. मुळात लठ्ठपणाकडे आजही आपल्याकडे एक प्रमुख आजार व समस्या म्हणून पाहिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.बॅरिऍट्रिकची गरज काय ?बरेचदा लठ्ठ माणसाला कमी कॅलरीज जेवण व व्यायाम वाढविण्यास सांगितले जाते. संतुलित आहार व व्यायामाचा फायदा निश्चितच होतो. पण काही व्यक्तींना त्याचा फायदा होत नाही, अशावेळी मेटाबॉलिजम वाढविणारी औषध द्यावी लागतात. त्यानंतरही फारसा फरक पडत नसल्यास त्याचे रूपांतर आजारात होते. अशावेळी बलून ट्रिटमेंट, बॅरिऍट्रिक सर्जरीचा अवलंब करावा लागतो. शरीरातील मेटाबॉलिजम बिघडला की वाढलेल्या फॅटची मेंदूला सवय होते. त्यामुळे या बिघडलेल्या मेटाबॉलिजमचा परिणाम इतर अवयवांवर व्हायला सुरुवात होते. अशावेळी हे असंतुलन नियमित करण्यासाठी जठर व आतड्यांमधून तयार होणारे चुकीचे संदेश नॉर्मल करून फॅट चे रुपांतर ऊर्जेत होऊन मेटाबॉलिजम नियमित होतो. त्यासाठी बॅरिऍट्रिक सर्जरीचा वापर होतो.बॅरिऍट्रिक सर्जरीचे प्रकार :फक्त जठरावर होणारी शस्त्रक्रिया : जठराचा गोलाकार भाग जेथे जास्तीत जास्त हार्मोन्स तयार होतात तो दुर्बिणीच्या माध्यमातून काढणे.गॅस्ट्रिक बायपास : बायपास म्हणजे दुसरा समान रस्ता. जठराकडून आतड्याकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता तयार केला जातो, ज्यामुळे फॅटचे शोषण कमी होते व भुकेचे प्रमाण मंदावते.बॅरिऍट्रिक समज-गैरसमज- कॅन्सर होऊ शकतो का?

या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरची शक्यता कमी होते.- शस्त्रक्रिया संपूर्ण पोट कापून म्हणजेच ओपन होते का?दुर्बिणीच्या साह्याने जठरावर केली जाणारी ही शस्त्रक्रिया आहे.- साईड इफेक्ट आहेत का?कोणतीही शस्त्रक्रिया केल्यानंतर आपलं शरीर नॉर्मल होण्यासाठी काही कालावधी लागतोच. त्यासाठी योग्य संतुलित आहार, व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावाच लागतो. गेल्या ५० वर्षांपासून या शस्त्रक्रिया जगभरात होतात. योग्य आहार, पौष्टिक जेवण घेतले तर त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतात.  वजन कमी झाल्यास लठ्ठपणा आणि या सगळ्या आजारांवर खात्रीने कायमची मात करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेमुळे हृदयरोग, स्लीप अप्निया, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांध्यातील वेदना, संधीवात, पीसीओएस आणि लठ्ठपणाशी संबंधित बऱ्याच कर्करोगाचा धोका कमी होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स