उत्तम आरोग्यासाठी महामॅरेथॉनमध्ये धावा - शोभा धारिवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:39 IST2019-02-05T02:38:41+5:302019-02-05T02:39:08+5:30

उत्तम आरोग्यासाठी दर्जेदार आहार घेणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि प्रकृतीला साजेसा व्यायाम करणे आवश्यक आहे. ‘लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेली महामॅरेथॉन ही उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता चांगली संधी आहे.

 Sufferable to run for great health | उत्तम आरोग्यासाठी महामॅरेथॉनमध्ये धावा - शोभा धारिवाल

उत्तम आरोग्यासाठी महामॅरेथॉनमध्ये धावा - शोभा धारिवाल

पुणे - उत्तम आरोग्यासाठी दर्जेदार आहार घेणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि प्रकृतीला साजेसा व्यायाम करणे आवश्यक आहे. ‘लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेली महामॅरेथॉन ही उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता चांगली संधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीत सहभागी व्हावे, असे आवाहन माणिकचंद ग्रुपच्या आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारिवाल यांनी केले आहे.
‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअ‍ॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉनचे येत्या १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.
धारिवाल म्हणाल्या, ‘‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या माध्यमातून शुद्ध पाणी वितरित करून ग्राहकांचे आरोग्य जपण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. या समाजहिताच्या उपक्रमास पाठिंबा देताना समाजऋण फेडल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे.’’

Web Title:  Sufferable to run for great health

टॅग्स :Puneपुणे