Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, कार्यकर्त्यांना सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 16:09 IST2023-06-26T16:07:32+5:302023-06-26T16:09:29+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर आषाढी वारी नियोजन दौरा उरकून सोलापूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना...

Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, कार्यकर्त्यांना सुखद धक्का
लोणी काळभोर (पुणे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांविषयीचा संवेदनशीलपणा रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पूर्व हवेलीतील नागरिकांना पाहावयास मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर आषाढी वारी नियोजन दौरा उरकून सोलापूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रात्री दीडच्या दरम्यान त्यांच्या वाहनांचा ताफा कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती येथे थांबला. दरम्यान, कदमवाकवस्ती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भेटीसाठी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, शिवसेना पुणे जिल्हा संघटक नीलेश काळभोर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कदमवाकवस्ती माजी उपसरपंच बाबासाहेब काळभोर, प्रतीक काळभोर, चेतन काळभोर, कपिल काळभोर, केतन साठे, विपुल गिरीमकर, सागर फडतरे आणि ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्या निवडणुकीस सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री साहेबांची अचानक भेट झाल्याने सर्वच कार्यकर्त्यांना एक सुखद धक्का बसला.