शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Video: मुलगी झाली हो...! पुण्यात मुलीचा अनोखा जन्मसोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:04 IST

आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात काही वर्षापूर्वी मुलगा हवाच याचा अट्टाहास धरला जात होता. मात्र अलीकडे ही परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे. यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना संदेश दिला जात असून, सामाजिक बदलाला चालना मिळत आहे.       खेड तालुक्यातील शेलगाव येथे नुकतचं मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत. पण मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरण्याची घटना या भागात प्रथमच घडली आहे. मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तर आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले. 

गावात हेलिकॉप्टर उतरताना बघण्यासाठी आणि मुलीची एक झलक बघण्यासाठी गावकरीही उपस्थित होते. आनंदानं, उत्साहानं मुलीच्या जन्माच्या शुभेच्छांच्या जयघोषात चिमुरडीचे वडिलांनी चिमुकल्या मुलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले. ‘माझ्या नवजात मुलीला हेलिकॉप्टरमध्ये आणून, मुलीचा जन्म एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा हाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे,’ असं ऍड. विशाल झरेकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वास्तविक ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबानं आपल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणून तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ही अतिशय उल्लेखनीय घटना असून, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं आहे, यात शंका नाही.

टॅग्स :AlandiआळंदीSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकmarriageलग्न