शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्न केल्यास हमखास यश : हेमामालिनी; ‘बी अ‍ॅन्ड द ड्रीमगर्ल’चे पुण्यात प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:29 IST

‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. 

ठळक मुद्देशब्दोत्सव महोत्सवात ‘बी अ‍ॅन्ड द ड्रीमगर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्रात्माक पुस्तकाचे प्रकाशनपहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर केलेला अभिनय अत्यंत वाईट, खूप काही ऐकून घ्यावे लागले : हेमामालिनी

विमाननगर : ‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. सिम्बायोसिस व फिक्की फ्लो यांच्या वतीने आयोजित दोनदिवसीय शब्दोत्सव महोत्सवात ‘बी अ‍ॅन्ड द ड्रीमगर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्रात्माक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या वेळी या पुस्तकावर परिसंवाद आयोजिला होता. या वेळी लेखक राजकमल मुखर्जी उपस्थित होते. शंतनू चौधरी यांनी हेमामालिनी व राजकमल मुखर्जी यांच्याशी संवाद साधला. आत्मचरित्राची निर्मिती व त्याच्या जीवनातील अभिनयक्षेत्रातील प्रवास याबाबत हेमामालिनी व राजकमल यांनी माहिती दिली. परिसंवादाची सुरुवात हेमामालिनी यांच्या जीवनावर आधारित एका ध्वनिचित्रफितीने करण्यात आली. त्यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात, गाजलेले चित्रपट, भूमिका, पुरस्कार यांसह राजकीय क्षेत्रातील प्रवास याचा त्यामध्ये समावेश होता. या वेळी हेमामालिनी यांनी त्यांच्या अभिनयक्षेत्रातील सुरुवात कशी झाली, याबद्दल माहिती दिली.

लेखक राजकमल मुखर्जी म्हणाले, हेमामालिनी कोणत्याही कामात शंभर टक्के योगदान देते. ती कोणालाही फसवत नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व ती टिकवून आहे. ती खऱ्या अर्थाने ड्रीमगर्ल आहे. या वेळी हेमामालिनी यांनी त्यांच्या अभिनय व राजकीय क्षेत्रातील अनुभव कथन केले. सध्याचे आघाडीचे ‘पद्मावत’ व ‘रझिया सुलतान’ या चित्रपटाच्या भूमिका व बजेट यावरदेखील चर्चा झाली. परिसंवादाचा हेमामालिनी यांनी त्यांच्या ‘गोपालो का समर्पण’ या नवीन भक्तिगीतांच्या अल्बममधील गीताच्या ओळी गाऊन समारोप केला.

पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर केलेला अभिनय अत्यंत वाईट होता. त्या वेळी खूप काही ऐकून घ्यावे लागले; मात्र त्यातूनच शिकायला मिळाले. पुढे जाऊन राजकपूर यांच्या ‘सपनों का सौदागर’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली. त्यात राज कपूर यांना मी केलेला अभिनय खूप आवडला. तू नक्कीच मोठी अभिनेत्री होशील, असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. पुढे अनेक चित्रपटांत संधी मिळाली. कुंटुबातील भक्कम मदतीनेच माझ्या अभिनय व राजकारण दोन्ही क्षेत्रांतील प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकल्याचे नमूद केले.

- हेमामालिनी, ज्येष्ठ अभिनेत्री  

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीsymbiosisसिंबायोसिसS B Mujumdarशां. ब. मुजुमदार