शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 20:46 IST

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे

शिक्रापूर : एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी  खेडचे विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र गरूड (चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर) हे क्लिनर ज्ञानेश्वर माळी यांच्यासमवेत डिझेलचा टॅँकर घेऊन कोरेगाव भीमा येथील सेको कंपनीत जात होते. लोणी काळभोर येथून नगर-पुणे रस्त्याने डिग्रजवाडी फाट्याच्या पुढे त्यांच्या पाठीमागून लाल रंगाची मोटार आली. ती टॅकरला आडवी लावून टॅंकर थांबविण्यास भाग पाडले. त्यातून एक व्यक्ती खाली उतरला. त्याने चालक गरूड यांना आपण पोलीस असल्याचे सांगत टॅंकरचालकाला कारमधील मोठ्या साहेबांकडे येण्यास सांगितले. तसेच टॅंकर पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले. टॅंकरचालकाने त्याला विचारले मात्र, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. त्यानंतर हा टॅँकर सणसवाडी हद्द्तील कल्पेश वे ब्रिजवर आणून त्याचे वजन केले आणि मोकळ्या मैदानात उभा करण्यास सांगितले.

टॅंकरचालकाला कारमध्ये बसवून टॅँकरमालक व त्यांचे मेहुणे दिगंबर जालिंदर शितोळे यांना व्हॉटस्अप कॉल करून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली. तसेच टॅँकर पोलिस ठाण्यात घ्यायला सांगून दोन ते तीन ठिकाणी सुमारे ३० ते ४० किलोमीटर फिरवून शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील हायवे किंग पेट्रोल पंपावर लावण्यास सांगितला. त्यानंतर तोतया पोलिस अधिका-याच्या कारमध्ये टॅंकरचालकाला बसविले व मलठण फाट्यावरील संजिवनी हॉस्पिटलजवळ आणले. तेथे टॅँकरमालक शितोळे यांच्याकडून अडीच लाख रूपये उकळले. याबाबत कुणाला सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि टॅँकर कसा चालतो, अशी धमकी दिली. 

पोलिस अधिक्षकांकडेच थेट तक्रार

या तोतया पोलिसाच्या धमकीमुळे चालक गरुड हे दहशतीत होते. मात्र, त्यानंतर गरूड यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली. सोमवारी (दि १४) त्यांच्याकडेच अपहरण आणि खंडणीची तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

दोषींवर कडक कारवाई करणार

''एका टॅकर चालकाने आपल्याकडे या प्रकरणी प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे.  हे प्रकरण गंभीर असल्याने खेड विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक तपासात या प्रकरणात एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशी नंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.''  

टॅग्स :PuneपुणेShikrapurशिक्रापूरPoliceपोलिसArrestअटकMONEYपैसा