उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर

By Admin | Updated: April 28, 2017 05:52 IST2017-04-28T05:52:35+5:302017-04-28T05:52:35+5:30

पूर्वीच्या बारामती नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सिल्व्हर ज्युबिली शासकीय

Sub-district hospital 'Saline' | उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर

उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर

बारामती : पूर्वीच्या बारामती नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला सध्या १०० बेडची मंजुरी आहे. नगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहिली. मात्र, मंजूर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची जवळपास ५० टक्केच पदे भरली आहेत. त्यामुळे सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरच बारामतीचे रुग्णालय चालविण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील ताळमेळ नसतो, अशा तक्रारी अनेकदा झाल्या. तातडीच्या उपचाराला विलंबच लागतो. शेवटी रुग्णांचे नातेवाईक ‘तोंडसुख’ घेतात. त्यामुळे या हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सुधारणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘आॅनकॉल’ डॉक्टरांवर भरोसा...
मागील काही वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजरीत सर्व अनागोंदी कारभार असतो. रात्रीच्या वेळी तातडीची रुग्णसेवा मिळत नाही, अशी तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आहे. खर्च करण्याची ऐपत नसतानादेखील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागते. अथवा त्यांना तसा सल्ला याच रुग्णालयातून दिला जातो. त्यामुळे टोलेजंग इमारत बांधून रुग्णसेवेत दाखल झालेल्या या सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात चांगली रुग्णसेवा कधी मिळणार, अशी विचारणा केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून आज या रुग्णालयाच्या सेवेची पाहणी करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेषत: मंजूर पदे असताना त्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘आॅनकॉल’ खासगी डॉक्टरांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागते.

Web Title: Sub-district hospital 'Saline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.