शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडापाव आणि बिस्कीटांवर विद्यार्थी काढताहेत दिवस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:00 IST

राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले.

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न : वर्षभरापासून अनेक विद्यार्थ्यांचे मेसचे पैसेच झाले नाहीत जमा 

- लक्ष्मण मोरे  पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चक्क वडापाव आणि बिस्कीटे खाऊन दिवस काढावे लागत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्षभरापासून पैसेच जमा होत नसल्याचे समोर आले आहे. खानावळीसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांची बिले ऑडिटच्या नावाखाली दोन-दोन महिने अदा केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढला आहे. शिक्षणाच्या ओढीने राज्यभरामधून लाखो विद्यार्थी विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर गाठतात. राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले.

त्यावेळी १२० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतीगृहामध्ये नव्या इमारती उभ्या करुन ही क्षमता ४०० पर्यंत वाढविली. याठिकाणी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांसाठी खानावळही सुरु केली होती. परंतू, कालांतराने जेवणाच्या दर्जावरुन झालेल्या वादामधून ही खानावळ बंद केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये खानावळीकरिता देण्यात येऊ लागले. परंतू, हे पैसेही वेळेत जमा होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून वसतीगृह प्रमुख (रेक्टर) पद रिक्त आहे. यापूर्वीच्या वसतीगृह प्रमुखांना बढती मिळाल्यानंतर नव्या प्रमुखांची तसेच निवासी वसतीगृह प्रमुखाचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे येथील सुविधांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी माणूसच उपलब्ध नसल्याने कुचंबना होऊ लागली आहे. काही दिवसांपुर्वी दोन लेखनिकांची याठिकाणी नेमणूक केली आहे. शासन निर्णयाप्रमाणे १०० विद्यार्थ्यांमागे एक वसतीगृह प्रमुख असणे आवश्यक आहे. परंतू सध्या ४०० विद्यार्थी असूनही एकाही प्रमुखाची नेमणूक केलेली नाही. वसतीगृहामध्ये स्वच्छता, देखभाल, विद्यार्थ्यांच्या समस्या आदींसाठी कर्मचाºयांची आवश्यकता आहे. परंतू, त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा आकृतीबंधच तयार केलेला नाही. २०१४ च्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये त्याचा समावेश केला नाही. सध्या केवळ एका सुरक्षारक्षकावर येथील सुरक्षेचा भार आहे. याठिकाणी तीन सुरक्षा रक्षक नेमलेले असून एक दिवसपाळीला आणि एकाची नियुक्ती रात्रपाळीला असते. तर तिसरा सुटीच्या दिवशी बदली कामगार म्हणून येतो. त्यामुळे येथील सुरक्षेचाही प्रश्न व्यवस्थित हाताळला जाण्याची आवश्यकता आहे.महापौर बंगला व घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या अगदी समोर असलेल्या या वसतीगृहाच्या अवस्थेकडे येथे येणाऱ्या  अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही. एकीकडे ह्या आलिशान वास्तू उभ्या आहेत, तर दुसरीकडे वसतीगृहामध्ये सुविधांची वानवा आहे.............

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfoodअन्न