लोणी भापकर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:10+5:302021-02-05T05:13:10+5:30
इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर विद्यार्थी शाळेत दाखल झाले ...

लोणी भापकर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू
इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात
आले आहेत.
तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. शालेय
शिक्षण विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना मिळतील, त्यानुसार अंमलबजावणी
करण्यात येत आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी वर्ग पूर्णपणे सॅनिटायझ करण्यात आले होते.
त्यानुसार पालकांकडून संमतिपत्र घेण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तापमान
मीटर तपासणी, ऑक्सिजन पातळी तपासणी, प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर, प्रत्येकाला मास्क यांसारख्या उपाययोजना शाळेत केल्या आहेत.
शिक्षण विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील, त्यानुसार अंमलबजावणी
करण्यात येत आहे. विद्यार्थीपण सूचनांचे पालन करत आहोत, असे विद्यालयाचे
मुख्याध्यापक
संदीप जगताप यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विद्यालयात स्वच्छता समिती,
आरोग्य समिती, आपत्कालीन समिती या समित्यांची स्थापना शाळा पातळीवर
करण्यात आली आहे. दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्यामुळे सर्व मित्र
-मैत्रिणी भेटल्यानंतर खूप आनंद झाला. ऑनलाईन शिक्षणापेक्षा शाळेतील
शिक्षणच चांगले असते, असे विद्यार्थ्यांच्याकडून भावना व्यक्त होताना
दिसल्या.
विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करताना शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी.
Attachments area