शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करतायेत कॅन्सरग्रस्त स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी निधीची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 16:21 IST

सफाई कर्मचाऱ्याच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करतायेत निधीची उभारणी

- राहुल गायकवाड पुणे : आपल्या अभ्यासिकेच्या परिसराची स्वच्छता करणाऱ्या मामांना कॅन्सर आहे हे कळाल्यानंतर तरुणांचे मन हळहळले. मामांची आर्थिक परिस्थिती हालाखीचीच. अशातच आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे असे अनेकांना वाटत हाेते. म्हणून मग त्यांनी त्यांच्या उपचारासाठी निधी गाेळा करण्याचा निर्णय घेतला. ते ज्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या ठिकाणी त्यांनी एक डाेनेशन बाॅक्स ठेवला अन प्रत्येकाला मदत करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वतः पैसै त्या बाॅक्समध्ये टाकले. काहीकरुन मामांच्या उपचाराचा निधी उभा करायचा असा चंग आता या विद्यार्थ्यांनी मनाशी बांधला आहे. 

राष्ट्रसेवा दल येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. राष्ट्र सेवा दलाचा परीसर माेठा आहे. या परिसराची साफसफाई पांडुरंग गालफाडे हे मामा करतात. त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. परंतु त्यांचा कॅन्सर अद्याप बरा झालेला नाही. त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या कहाणीबद्दल कळाल्यानंतर या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक डाेनेशन बाॅक्स तयार केला. सर्व विद्यार्थ्यांना मामांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी जमेल तेवढे पैसै त्या डाेनेशन बाॅक्समध्ये टाकले. या विद्यार्थ्यांना गालफाडे यांच्या उपचारासाठी लागणारा निधी उपलब्ध करायचा आहे. 

याबाबत बाेलताना येथील विद्यार्थी प्रशांत इंगळे म्हणाला, गालफाडे मामा येथील परिसराची साफसफाई मनापासून करतात. जेव्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले तेव्हा त्यांना मदत करायला हवी असे आम्हा सर्वांनाच वाटले. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी निधीची उभारणी करत आहाेत. राेहित पाटील म्हणाला, आजारी असताना देखील गालफाडे मामा परिसराची मनापासून सफाई करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांना आपल्या परीने हाेईल तितकी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही डाेनेशन बाॅक्स अभ्यासिकेत ठेवला आहे. 

दरम्यान ज्यांना काेणाला मामांच्या उपचारासाठी मदत करायची आहे त्यांनी 7709224548 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यcancerकर्करोगStudentविद्यार्थी